एकाच गावात बरेच अधिकारी हे ऐकून आश्चर्य वाटले असेल. पण हे खरे आहे.मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेले आदिवासीबहुल पडियाल गाव ‘अधिकाऱ्यांचे गाव’ म्हणून ओळखले जाते.मध्य प्रदेश सरकारच्या दाव्यानुसार पडियाल गावाचा साक्षरता दर ९० टक्क्यांहून अधिक आहे.दोन वर्षांपूर्वीपर्यंत या गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या ७० होती. आता शंभर पार करेल.
सुमारे ५५०० लोकसंख्या असलेल्या या आदिवासी बहुल गावात ३०० हून अधिक सरकारी कर्मचारी आणि १०० हून अधिक उच्चपदस्थ अधिकारी देश आणि राज्याची सेवा करत आहेत. यामध्ये कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय पोलीस सेवा अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी, डॉक्टर, सरकारी वकील, वन अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.लोकसंख्या भिल्ल जमातीची आहे. भिल्ल समुदाय मध्य भारतातील धार, झाबुआ आणि मध्य प्रदेशातील पश्चिम निमार जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावात राहतो.
या गावात प्रत्येक घरातून सरासरी एक सरकारी कर्मचारी आहे.गावाने सुरुवातीपासून शिक्षणावर अधिक भर दिला आहे. शाळकरी मुलांमध्ये प्रशासकीय सेवा, तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रांची आवड निर्माण केली जाते. त्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनापासूनच करून घेतली जाते. गावाने सुरुवातीपासून शिक्षणावर अधिक भर दिला आहे. शाळकरी मुलांमध्ये प्रशासकीय सेवा, तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रांची आवड निर्माण केली जाते. गावातील काही तरुण तर अमेरिका, मलेशियासारख्या देशांमध्ये स्थायिक आहेत.