महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 4010 जागांवर भरती ; 10वी उत्तीर्णांना मोठी संधी..
Arogya Vibhag Group D Recruitment 2023 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण जागा : 4010
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) 3269
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
2) नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) 183
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
3) नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) 461
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
4) अकुशल कारागीर (परिवहन) 80
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/N.C.T.V.T.
5) अकुशल कारागीर (HEMR) 17
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
निवड पद्धत :
उमेदवारांची निवड संगणक आधारित परिक्षेव्दारे (Computer Based Online Examination) ऑनलाईन परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.
उमेदवाराने परिक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरविण्यात येईल.
परिक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/१३अ, दिनांक ०४ मे, २०२२ मधील निकषावर लावला जाईल.
भरतीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय लागू राहतील.
शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग, क्रं. एसआरव्ही-२०००/प्र.क्रं१७(२०००)/१२, दिनांक २८ मार्च २००५ व शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-२०००/प्र.क्रं.१७/२०००/१२, दिनांक १ जुलै २००५ नुसार लहान कुंटूब असल्याचे प्रतिज्ञापत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे. (अविवाहीत उमेदवारांनी लागू नाही असे नमूद करुन स्वत:ची स्वाक्षरी करावी)
अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रं. अनियो-१००५/१२६/सेवा-४, दिनांक ३१-१०-२००५ नुसार नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना लागू होईल; सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही
गट ड संवर्गाची पदे भरताना कार्यालय निहाय माहिती उमेदवारास उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एका जिल्हयातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल. हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राहय धरणेत येईल. अंतिम निवडीकरिता जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार पद निवडी करीता पर्याय उमेदवारास उपलब्ध करुन देण्यात येईल.
इतका पगार मिळेल :
पद क्र.1: 15000-47600
पद क्र.2: 15000-47600
पद क्र.3: 15000-47600
पद क्र.4: 15000-47600
पद क्र.5: 15000-47600
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
शुद्धीपत्रक: पाहा
अधिकृत संकेतस्थळ :