स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत!
लहानपणी राहुल यांचे पोलिस खात्यात जाण्याचे स्वप्न होते.ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत देखील घेत होते.त्या मेहनतीचे आता चीज झाले आहे.राहुल ज्ञानोबा जाधव हे मूळचे लातूरचे आहेत. त्यांचे वडील खासगी वाहनावर चालकाची नोकरी करतात.इच्छा होती परंतु
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने राहुलला नोकरी करण्याची गरज होती.
उच्च माध्यमिक शिक्षण होताच वयाच्या २१ व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. त्यांनी (२०१६) मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात (२०१५) त्यांचे लग्नही झाले. त्यामुळे संसाराचा गाडा चालवत त्यांना हे ध्येय गाठायचे होते.अशी नोकरी करतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेत तयारी सुरु केली. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, नोकरी करतानाच अडचणीवर मात करीत राहुल जाधवने अखेर आपल्या ध्येयाला गवसणी घातली.
पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदी निवड!
अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असूनही काम सांभाळत अभ्यास चालू ठेवला.त्यांना या सर्व वाटचालीत कुटुंबांची साथ लाभली.त्यामुळे ते हे यश प्राप्त करू शकले.भरपूर अभ्यास आणि चिकाटी या जोरावर राहुल जाधव यांची पहिल्याच प्रयत्नात खात्याअंतर्गत त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. याच महिन्यात लागलेल्या एमपीएससीच्या निकालात त्याने राज्यातून ६८ वा क्रमांक मिळविला.
मित्रांनो, स्वप्न नक्कीच बघा.पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची देखील तयारी ठेवा.या जिद्दीच्या जोरावरच यश मिळवता येते.