⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदाच्या 27 जागांसाठी भरती ; 81,000 पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 27

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी) – 09 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी माध्यमिक शाळा परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने शालेय किंवा समकक्ष परीक्षेत प्रत्येकी १०० गुणांचे मराठी आणि इंग्रजी विषय दिले पाहिजेत., उमेदवाराकडे इंग्रजी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 80 शब्द प्रति मिनिट या वेगाने सरकारी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळाकडून एमएससीआयटी परीक्षा प्रमाणपत्र धारक असावा.

२) ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (मराठी)- 27 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी माध्यमिक शाळा परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने शालेय किंवा समकक्ष परीक्षेत प्रत्येकी १०० गुणांचे मराठी आणि इंग्रजी विषय दिले पाहिजेत. उमेदवाराकडे मराठी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी लघुलेखनात 80 शब्द प्रति मिनिट या वेगाने सरकारी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळाकडून एमएससीआयटी परीक्षा प्रमाणपत्र धारक असावा.

वयोमर्यादा :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 ते 43 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 25,500 ते 81, 100/-
नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2023 
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई-400001

अधिकृत संकेतस्थळ : www.mcgm.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article