⁠  ⁠

महाराष्ट्रात 4थी उत्तीर्णांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.. 52,400 पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Bombay High Court Recruitment 2023 थी पाससाठी सरकारी नोकरीची संधी चालून आलीय. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 03

रिक्त पदाचे नाव : कूक / Cook
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान चौथी पास असावा
वयो मर्यादा :
उमेदवार जाहिरात प्रसिध्दीच्या तारखेला १८ वर्षापेक्षा लहान व ३८ वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षाची असेल. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही, तथापि, त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारास सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थसुध्दा बनवता येणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित (self attested) केलेल्या प्रति सादर कराव्यात –

शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (उदा. ४थी, ७वी, १०वी, १२वी आणि पदवी इत्यादी).
जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) अथवा तत्सम
अधिकान्याने प्रदान केलेला जन्मतारखेचा पुरावा.
उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला.
जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी).
स्वयंपाकाचा पुर्वानुभव असल्यास संबंधीत हॉटेल / केटरींग व्यावसायिकाने दिलेला दाखला.
विशेष पाककृती संबंधी प्राविण्याबाबतचा दाखला (असल्यास)
महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत, जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तऐवज उदा. शासकीय राजपत्र किंवा
सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला,
न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज.
उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले/ कागदपत्रे जोडावीत-

किती पगार मिळेल?
पात्र उमेदवारांना 16,600 ते 52,400 /-रुपये दरमहा पगार मिळेल

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 02 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९.

अधिकृत संकेतस्थळ : bombayhighcourt.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Application Form: येथे क्लिक करा

Share This Article