संसार, नोकरी व कार्यभार सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? हा खूप जणांपुढे प्रश्न असतो. पण या दोघांनी स्पर्धा परीक्षेची व्यवस्थित तयारी करून यश मिळवले अहे.कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ यामुळे यशाची वाट सुकर झाली आहे.उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले. सुरेश चासकर व मेघना चासकर, अशी या उत्तीर्ण यशस्वी झालेल्या अधिकारी पती-पत्नीची नावे आहेत. त्यांचे मे २०२२ मध्ये लग्न झाले.
त्यानंतर त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने अभ्यास केला आणि दोघांचीही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत दोघांची वर्ग एक पदी निवड झाली.मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव हे आहे.के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदव्युत्तर शिक्षण घेतले.
पदवी काळातच स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू ठेवली होती. तर सुरेश यांचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील सायाळ्याचे आहे. त्याचे देखील अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाले आहे.सुरेश चासकर यांची यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या, नगररचना व मूल्यनिर्धारण विभागात, नगररचना सहाय्यक पदी नियुक्ती झाली होती.
पण दोघेही नोकरी करून आल्यावर विषयांच्या नोट्सची चर्चा करायचे. त्यातील बारकावे लक्षात घ्यायचे. या अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर दोघांनी सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.