---Advertisement---

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये विविध पदांची भरती

By Chetan Patil

Updated On:

CIDCO Recruitment
---Advertisement---

CIDCO Recruitment 2025 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 29

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच उमेदवाराला ज्या क्षेत्रात काम करावे लागेल त्या क्षेत्रातील स्पेशलायझेशन
2) क्षेत्राधिकारी (सामान्य)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 नोव्हेंबर 2024 रोजी 38 ते 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: 1180/- रुपये [राखीव प्रवर्ग: 1062/- रुपये.]
इतका पगार मिळेल :
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) – 56,100/- ते 1,77,500/-
क्षेत्राधिकारी (सामान्य) – 41,800/- ते 1,32,300/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

निवडीचे निकष :
1) गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विहित अर्हता/अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
2) एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. 02.12.2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
3) सहाय्यक विकास अधिकारी या वर्ग अ मधील पदासाठी अंतिम निवडीकरीता ऑनलाईन परीक्षेचे 200 गुण व मुलाखतीचे 25 गुण असे एकुण 225 पैकी गुण गृहित धरण्यात येतील.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : cidco.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now