महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC द्वारे राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती होणार आहे. शासन निर्णयातील तरतूदी व सूचना विचारांत घेवून विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन क्र. २ येथील शासन पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे.
दि.१.१.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ या कालावधीत नियोजित स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आला असून, स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे (प्रत सोबत).
त्यानुसार लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे “महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३” मधून भरावयाचे प्रस्तावित असून, त्याकरीता जाहिरात जानेवारी, २०२३ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार असल्याने त्यासंबंधातील पदांचे मागणीपत्र पाठवितांना सद्या रिक्त असलेली पदे व नजिकच्या काळात पदोन्नती / सेवानिवृत्ती इत्यादी बाबींमूळे रिक्त होणारी पदे विचारांत घेण्याचे आयोगाने कळविले आहे.
विहित दिनांकापर्यंत परिपूर्ण लिपिक-टंकलेखक (महसूल सहाय्यक) संवर्गाचे मागणीपत्र शासनास प्राप्त न झाल्यास सन २०२३ मध्ये संबंधित कार्यालयाची पदे भरावयाची नाहीत, असे समजण्यात येईल. तसेच स्पर्धा परीक्षांच्या सन २०२३ च्या अंदाजित वेळापत्रकामध्ये संबंधित कार्यालायातील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार नाही. परिणामी सदर संवर्ग /पदावरील भरतीसाठी सन २०२३ मध्ये आयोगास भरतीप्रक्रीया राबविणे शक्य होणार नाही. याची नोंद घ्यावी, ही विनंती.
GR पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
प्रकरणी आवश्यक त्या समन्वयासाठी संबंधित उपायुक्त (महसूल) यांची त्यांच्या महसुली विभागाकरीता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या विभागातील सर्व जिल्ह्यांकडून मागणीपत्र प्राप्त करुन घेवून एकत्रितरित्या दि.८.१२.२०२२ पर्यंत निश्चितपणे सादर करण्याची दक्षता घ्यावी.