CRPF Recruitment 2023 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने विविध पदांच्या नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 पर्यंत असणार आहे.
एकूण रिक्त जागा : 212
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) उपनिरीक्षक SI (RO) -19 पदे
शैक्षणीक पात्रता : गणित, भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान या विषयांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समतुल्य.
2) उपनिरीक्षक SI (क्रिप्टो) – 07 पदे
शैक्षणीक पात्रता : गणित आणि भौतिकशास्त्र विषय म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
3) उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – 05 पदे
शैक्षणीक पात्रता : B.E./B.Tech किंवा मुख्य विषय म्हणून इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये समकक्ष किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सचे पात्र सहयोगी सदस्य.
4) उपनिरीक्षक SI (सिव्हिल) (पुरुष) – 20 पदे
शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/संस्था किंवा विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा समकक्ष सह इंटरमिजिएट.
5) सहायक उपनिरीक्षक ASI (तांत्रिक) – 146 पदे
शैक्षणीक पात्रता : डिप्लोमा इन रेडिओ/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजी. किंवा B.Sc. भौतिकशास्त्र, रसायन, गणित सह
6) सहायक उपनिरीक्षक ASI (ड्राफ्ट्समन)- 15 पदे
शैक्षणीक पात्रता : ड्राफ्ट्समन/सिव्हिल मेक मध्ये डिप्लोमा. इंजी.
वयाची अट :
अर्ज करणार्या अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. वयाची गणना अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार केली जाईल म्हणजेच 25 मे 2023
परीक्षा फी : SI पदासाठी अर्ज करणार्या जनरल / OBC / EWS श्रेणीतील उमेदवाराला ₹ 200 अर्ज शुल्क भरावे लागेल. आणि ASI पदासाठी अर्ज करणार्या Gen/ OBC/ EWS श्रेणीतील उमेदवाराला ₹ 100 ची अर्ज फी भरावी लागेल. SC/ST/महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया
पुढील प्रक्रियेनंतर उमेदवाराची निवड केली जाईल:-
लेखी परीक्षा
शारीरिक मानक चाचणी (PST)/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
इतका पगार मिळेल?
उपनिरीक्षक SI (RO) – 35400-112400
उपनिरीक्षक SI (क्रिप्टो) – 35400-112400
उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – 35400-112400
उपनिरीक्षक SI (सिव्हिल) (पुरुष) – 35400-112400
सहायक उपनिरीक्षक ASI (तांत्रिक) 29200-92300
सहायक उपनिरीक्षक ASI (ड्राफ्ट्समन)-29200-92300
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2023
परीक्षेची तारीख : 24-25 जून 2023