---Advertisement---

Current Affairs – 20 September 2018

By Rajat Bhole

Updated On:

tiheri-talakh-act
---Advertisement---

तिहेरी तलाक ठरणार गुन्हा, अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

  • तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक राज्यसभेत मंजूर करुन घेण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. केंद्र सरकारने तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणारे विधेयक लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले.
  • पण राज्यसभेत हे विधेयक अडकून पडले आहे. विरोधी पक्षांना या विधेयकातील काही मुद्यांवर आक्षेप आहे. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक संबंधी निकाल देताना तिहेरी तलाकला घटनाबाह्य, बेकायद ठरवले होते तसेच केंद्र सरकारला यासंबंधी कायदा करण्यासही सांगितले होते.
  • तिहेरी तलाक विरोधातील या विधेयकात केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात तीन सुधारणा केल्या आहेत. नव्या सुधारणांनुसार प्रस्तावित कायदा अजामिनपात्र आहे. पण खटला चालू होण्यापूर्वी आरोपी जामिनासाठी न्यायादंडाधिकाऱ्याकडे दाद मागू शकतो. अजामिनपात्र गुन्हा असल्यामुळे पोलीस परस्पर आरोपीची सुटका करु शकत नाहीत.
  • दुसऱ्या सुधारणेनुसार पतीने तीनवेळा तलाक शब्द उच्चारुन तलाक दिल्यास पीडित पत्नी किंवा तिच्या जवळचे नातेवाईक आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल करु शकतात. त्यानंतर पीडित पत्नी पतीबरोबर तडजोड करण्यास तयार असेल तर न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करुन तोडगा काढू शकतात. अशावेळी गुन्हा मागे घेता येऊ शकतो.

telegram ad 728

मोदी सरकारच्या राजवटीत थकीत कर्जाचे प्रमाण तिप्पट

  • केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ३० जून २०१४ ते डिसेंबर २०१७ या तीन वर्षांच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या थकीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) तिपटीपेक्षा जास्त वाढले आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
  • ३० जून २०१४ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण एनपीए २ लाख २४ हजार ५४२ कोटी रुपये होता. डिसेंबर २०१७ च्या अखेरीस एनपीएचे प्रमाण ७ लाख २३ हजार ५१३ कोटी रुपये होते. बँकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आरबीआयने ही माहिती दिली. ३० जून २०१८ पर्यंत थकीत कर्जाची काय स्थिती आहे ? या प्रश्नावर आरबीआयने माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले.

मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांना अटक

  • मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांना बुधवारी कोटय़वधी डॉलर्सच्या भ्रष्टाचार प्रकरणी तेथील भ्रष्टाचार विरोधी संस्थेने अटक केली आहे. आता त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात येणार आहेत. भ्रष्टाचार विरोधी संस्थेने सांगितले, की नजीब यांना त्यांच्या कार्यालयातच अटक करण्यात आली असून, त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
  • प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करून चौकशीला लगाम घातला होता. भ्रष्टाचारामुळे त्यांच्या विरोधात संतापाची लाट होती. त्यामुळे ९ मे रोजी नजीब यांच्या सत्ताधारी आघाडीला पराभवास सामोरे जावे लागले.

भारताची पाकिस्तानवर ८ गडी राखून मात, कर्णधार रोहित शर्माचं आक्रमक अर्धशतक

  • आशिया चषकातील साखळी सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी लिलया पार केलं. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली, त्याला सलामीवीर शिखर धवनने ४६ धावा काढून चांगली साथ दिली.
  • यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं आव्हान अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक जोडीने पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. फईम आणि शादाबचा अपवाद वगळता एकही गोलंदाज आपली छाप पाडू शकला नाही.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now