⁠
Uncategorized

Current Affairs – 27 September 2018

Supreme Court Aadhaar Card Verdict

  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे. न्या. ए. के. सिकरी, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. अशोक भूषण यांचाही घटनापीठात समावेश आहे. चार विरुद्ध एक अशा मताने हा निर्णय देण्यात आला.आधार’च्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब
  • आधार’च्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना असल्याचे आज सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले आहे. तसेच ‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांवरती टेहळणी करणे अत्यंत कठीण असल्याचेही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. ‘आधार’ कार्ड सुरक्षित असून यामुळे गरीबांना बळ मिळाले आहे. ‘आधार’ कार्ड सर्वसामान्यांची ओळख असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
  • आधारला वैध ठरवतानाच सुप्रीम कोर्टाने आधार अॅक्टमधील ३३(२) हे कलम मात्र रद्द केले आहे. या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती (ऑथेंटिकेशन डेटा) पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवण्याची तरतूद होती. जी सुप्रीम कोर्टाने रद्द करून केवळ सहा महिनेच ही माहिती साठवता येईल, असा आदेश न्या. सिकरी यांनी दिला.
  • शिक्षणाने आपल्याला अंगठ्याकडून सहीकडे नेले, तर तंत्रज्ञानाने आपल्याला पुन्हा सहीकडून बोटाच्या ठशाकडे आणले, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सिकरी यांनी नोंदवले.बँक खाते, मोबाईल नंबर व शाळांमधील आधारसक्तीबाबत
  • आधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मोबाईल नंबर, बँक खाते, शाळेतील प्रवेश तसेच बोर्डाच्या परीक्षेतील आधार सक्तीबाबतही महत्त्वपूर्ण मत मांडले. सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी ‘आधार’ची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेतील प्रवेशासाठीही ‘आधार’ सक्ती करता येणार नाही. याशिवाय बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.आधार विधेयकाला राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकता नाही
  • आधार विधेयक हे लोसभेचं मनी बिल असल्यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केले आहे. केंद्र सरकारचं बहुचर्चित आधार विधेयक वैधतेच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या प्रतीक्षेत होतं. सु्पीम कोर्टानं आधार विधेयक वैध असल्याचा निकाल देताना ते मनी बिल असल्यावरही शिक्कामोर्तब केले आहे.‘आधार’ नसेल तरीही कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही: सुप्रीम कोर्ट
  • आधार कार्डचे प्रमाणीकरण अयशस्वी झाल्याचे कारण देऊन सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही, असे महत्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
  • काही वेळेस आधार कार्डचे प्रमाणीकरण होऊ शकत नाही. अशावेळी कल्याणकारी योजनेअंतर्गत त्या व्यक्तीला मिळणारे फायदे नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर सरकारने देशात बेकायदारित्या घुसखोरी करणाऱ्यांना आधार कार्ड मिळत नसल्याची खात्री करावी, अशी विशेष सूचना दिली.

SC/ST Quota: पदोन्नतीत आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

  • एससी, एसटी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने थेट आरक्षण रद्द न देता, हा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. पदोन्नतीचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारित येत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
  • याआधी राज्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी डाटा सादर करणं अनिवार्य होतं, मात्र ही अट आता सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकली आहे. यासोबतच पदोन्नती मिळण्यासंबंधीच्या २००६ मधील नागराज प्रकरणाच्या निर्णयाची सात सदस्यांच्या खंडपीठाकडे फेरतपासणी करण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण: सुप्रीम कोर्टाचा निकाल

  • न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याची सुरूवात सुप्रीम कोर्टातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
  • याचिकेवर बुधवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय दिला. जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील, असे कोर्टाने निर्णय देताना सांगितले.

विराट कोहली, मीराबाई चानू खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना आज खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. विराट कोहली खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
  • याआधी १९९७ साली सचिन तेंडुलकर आणि २००७ साली महेंद्रसिंह धोनीला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
  • क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. दरवर्षी हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टरोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. मात्र यंदा आशियाई खेळांमुळे या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
  • कर्णम मल्लेश्वरी आणि कुंजराणी यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई चानू ही तिसरी महिला वेटलिफ्टर ठरली आहे. याव्यतिरीक्त विविध क्रीडा प्रकारातील २० खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Related Articles

Back to top button