भारताने रशियाबरोबर केला एस-४०० खरेदी करार
- भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस येथे बैठक संपन्न झाली. भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
- एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमचा सर्वात महत्वाचा करार होता. या करारातंर्गत भारत ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजून एस-४०० प्रणाली रशियाकडून विकत घेणार आहे. भारत आणि रशियामध्ये हा करार झाल्यानंतर अमेरिकेकडून भारतावर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. यावर्षातील मोदी आणि पुतिन यांच्यातील ही तिसरी बैठक होती.
- रेल्वे, अवकाश कार्यक्रमासह भारत-रशियामध्ये आठ करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- संरक्षणासह रेल्वे, अवकाश, अण्वस्त्र सहकार्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार झाले.
- दोन्ही देशांमध्ये अवकाश सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. रशियात सायबेरीया जवळच्या नोवोसिबिर्स्क शहरात भारत आपले मॉनिटरींग स्टेशन उभारणार आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि अवकाश सहकार्य यासंबंधीच्या महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होईल असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता.
हापूस आंब्याला जागतिक मान – भौगोलिक मानांकन
- फळांचा राजा हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने या मानांकनाची घोषणा केली. मानांकनामुळे हापूसची ओळख जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
- रत्नागिरी, सिंधुर्दुग व लगतच्या परिसरातील हापूसला मिळालेले हे भौगोलिक मानांकन उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे. त्यानुसार त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता त्याच्या मूळ भौगोलिक स्थानावरून ओळखली जाते. भौगोलिक मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहान विभागाने हापूस आंब्यास मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते.
पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ७४.१०वर
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा परिणाम
- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळे शेअऱ बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली, सेंसेक्स ९०० अंकांनी कोसळला तर रुपया पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक निचांकी पातळीवर गेला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ७४.१० वर पोहोचली.
- डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरत चाललेली किंमत थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करु शकते, असे सकाळी अर्थतज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र, असे झाले नाही, रिझर्व्ह बँकेने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून रुपयाची घसरण रोखण्याचे रिझर्व्ह बँकेने केलेले प्रयत्न काही खास यशस्वी झाले नाहीत. यामुळे आयात महागली आहे.
The Nobel Peace Prize 2018
डेनिस मुक्वेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल जाहीर
- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या शांततेच्या नोबेल पुरस्कारांची आज (शुक्रवार) घोषणा करण्यात आली. डेनिस मुक्वेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद या दोघांना संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युद्धप्रसंगी आणि सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक शोषणाचा हत्यार म्हणून वापर करणे बंद व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल या दोघांना शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात येणार आहे.
- यंदा जाहीर झालेल्या शांततेच्या नोबेलचे पुरस्कर्ते मुक्वेगे यांनी युद्ध प्रसंगी लैंगिक शोषण झालेल्या पीडितांचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांची सहकारी नादिया मुराद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी स्वतःवर झालेला आणि दुसऱ्यांवर झालेल्या शोषणाविरोधात लढा दिला आहे.
नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel