The Nobel Economics Prize 2018
विल्यम नोर्दहॉस, पॉल रोमर यांना अर्थशास्त्रातला नोबेल जाहीर
- विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर यांना अर्ल्फेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हवामान बदल आणि आर्थिक विकासाबाबत केलेल्या संशोधनासाठी रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी (दि.८) या दोघांच्या नावाची नोबेलसाठी घोषणा केली.
- विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर हे दोघे अर्थशास्त्रज्ञ अमेरिकेचे नागरिक आहेत. नोर्दहॉस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे येल विद्यापीठातूनच घेतले आहे. त्यांनी प्रतिष्ठित मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.
राज्यात हुक्का बंदी लागू
महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
- राज्यामध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
- हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरलं आहे.महाराष्ट्राआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हुक्का पार्लरवरील बंदीचे विधेयक महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते.
भालाफेकपटू संदीप चौधरीची सुवर्णकमाई
पॅरा आशियाई खेळांमध्ये भारताचं पहिलं सुवर्णपदक
- भारताचा दिव्यांग भालाफेकपटू संदीप चौधरीने जकार्तात सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
- संदीपने अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 60.01 मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. श्रीलंकेच्या चामिंडा संपथ हेट्टीला रौप्य तर इराणच्या ओमिदी अलीने कांस्य पदकाची कमाई केली. रविवारी याच स्पर्धेत भारताने दोन रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई केली होती.
नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel