पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी मोठी भरती, 9वी पासही अर्ज करू शकतो..
Deccan Education Society Bharti 2023 डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, वाणिज्य पदवीधर, एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र, टॅली प्रमाणपत्र
२) प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.
३) ग्रंथालय सहाय्यक / ग्रंथालय लिपिक
शैक्षणिक पात्रता : बी. लिब. (B. Lib) / एम. लिब.(M. Lib)
४) कनिष्ठ संपदा पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य पदविका धारक
५) शिपाई
शैक्षणिक पात्रता : किमान 9 वी पास
६) प्रयोगशाळा परिचर
शैक्षणिक पात्रता : किमान 9 वी पास
७) ग्रंथालय परिचर
शैक्षणिक पात्रता : किमान 9 वी पास
८) प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / पदव्यत्तुर पदवी धारक, एम. एस. सी. आय. टी.
९) डिजिटल मार्केटिंग कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : डिजिटल मार्केटिंग प्रमाणपत्रासह पदवी / पदव्युत्तर / डिप्लोमा, एसइओचे प्रदर्शन, CTP
परीक्षा फी : खुल्या प्रवर्गासाठी 200/- रुपये [राखीव प्रवर्ग: 100/- रुपये]
पगार : नियमानुसार.
उमेदवारांसाठी महत्वाचं :
संकेतस्थळावर उपलब्ध प्राथमिक माहितीसाठीचा ऑनलाईन फॉर्म भरणेही आवश्यक आहे.
अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १० दिवस (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) असेल.
उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त सर्व पदे कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्वावर आहेत. नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची संस्थेच्या प्रशासकीय सोयीसाठी संस्थेच्या इतर कोणत्याही घटक संस्थेमध्ये बदली केली जाऊ शकते.
उमेदवाराने अर्ज काळजीपूर्वक व पूर्णपणे भरणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सदर भरलेल्या माहितीबाबत भविष्यात तक्रार-उद्भवल्यास संबंधित व्यक्ती त्यास पूर्णपणे जबाबदार असेल.
उमेदवाराने अर्जामध्ये माहिती भरत असताना पत्रव्यवहारासाठी अचूक पत्ता, कार्यान्वित असलेला अचूक भ्रमणध्वनी ( Mobile No.) क्रमांक व ई-मेल आय. डी. नमूद करावा जेणेकरून उमेदवारांशी संपर्क करून आवश्यक त्या सूचना देणे सुलभ होईल
10वी ते पदवीधरांसाठी 709 पदांसाठी भरती
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: डेक्कन एज्यकुेशन सोसायटी, मध्यवर्ती कार्यालय फर्ग्युसन महाविद्यालय परिसर, पुणे 411 004
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.despune.org