महाराष्ट्रात नवीन बंपर भरती जाहीर ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..
Directorate of Sports and Youth Services Bharti 2023 क्रीडा व युवक सेवा संचालनालय मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 111
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्रीडा अधिकारी – 59
शैक्षणिक पात्रता :
01) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
02) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
03) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा
04) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
2) क्रीडा मार्गदर्शक – 50
शैक्षणिक पात्रता :
01) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
02) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
3) निम्न श्रेणीतील लघुलेखक – 01
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
02) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
4) शिपाई – 01
शैक्षणिक पात्रता : माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ/ अनाथ – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग – 900/- रुपये]
पगार :
क्रीडा अधिकारी – 38600/- ते 122800/-
क्रीडा मार्गदर्शक – 38600/- ते 122800/-
निम्न श्रेणीतील लघुलेखक – 38600/- ते 122800/-
शिपाई – 15000/- ते 47600/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.sports.maharashtra.gov.in