संतोष पटेल याच्या घरची परिस्थिती बेताची…. एका छोट्याशा झोपडीत राहून जडणघडण झाली…झोपडीत लाईट नसल्याने दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. दोन वेळचे जेवणही मिळणे फार कठीण होते.
मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात शालेय शिक्षण पूर्ण झाले.त्यानी बारावीनंतर आयआयटीची तयारी केली, पण त्यात अपयश आले. त्यानंतर त्यांनी भोपाळच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगचा कोर्स केला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर संतोष यांनी एम.टेकला प्रवेश घेतला.
कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी दगड फोडण्याची कष्टाची कामे केली.पुढे, नोकरी न करता त्यांनी पीएससी उत्तीर्ण करण्याचा निर्धार केला आणि त्यांनी कठोर परिश्रम सुरू केले. पहिल्या प्रयत्नात ते अपयशी ठरले, पण दुसऱ्या प्रयत्नात संतोष यांना यश मिळाले. मध्य प्रदेश सरकारच्या प्लॅनेटरी विभागात पोलिस उपअधीक्षक पदासाठी त्यांची निवड झाली.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या संतोष पटेल यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेली कामगिरी अनेकांना प्रेरणादायी आहे.अनेक अडथळ्यांवर मात करून संतोष पटेल डीएसपी झाले.