⁠
Jobs

GMC कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती; पात्रता 10वी पास अन् पगार 63200 पर्यंत

GMC Kolhapur Recruitment 2024 : 10वी पास असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 102

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) – 08
2) शिपाई (महाविद्यालय) – 03
3) मदतनीस (महाविद्यालय) – 01
4) क्ष-किरण परिचर (रुग्णालय)- 07
5) शिपाई (रुग्णालय) – 08
6) प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) – 03
7) रक्तपेढी परिचर (रुग्णालय) – 04
8) अपघात सेवक (रुग्णालय) – 05
9) बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) – 07
10) कक्ष सेवक (रुग्णालय) – 56

शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरीता सामाईक अर्हता.)
प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शास्त्र (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हताः तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी. उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकीट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-]
पगार : 15,000/- ते 63,200/-

नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत
: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://rcsmgmc.ac.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button