⁠  ⁠

मासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा?

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read

नमस्कार मित्रांनो,  How to read Magazines for Competitive Exams

स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना जवळपास सर्वांच्या मनात पुढील प्रश्‍न येतातच…

१. चालू घडामोडींची तयारी कशी करावी?

२. चालू घडामोडींमध्ये काय वाचावे?

३. चालू घडामोडी केव्हापासून वाचाव्यात?

४. चालू घडामोडींचा अभ्यास किती वेळ करावा?

स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींचा ठरावीक असा अभ्यासक्रम नाही. तरी मागील काही वर्षातील प्रश्‍नपत्रीकांचे विश्‍लेषन केल्यास आपल्याला त्याचा ढाचा लक्षात येईल. चालू घडामोडींचे प्रश्न कशावरही येवू शकतात. त्यासाठी तुम्ही दररोज कमीत कमी ३ ते ४ मराठी व इंग्रजी वर्तमानपत्र, ४ ते ५ मासिके, टीव्ही (केवळ दुरदर्शन), रेडियोवरील बातम्या, इंटरनेटवरील माहिती वाचायला हवी. पंरतु केवळ वाचून फायदा नसून याच्या स्वत:ला समजतील अशा नोट्स तयार करव्यात. परीक्षेच्या शेवटच्या क्षणी यांची मदत होवू शकेल.

मासिके कशी वाचावीत?

राज्यसेवा आणि इतर परीक्षेत असणार्‍या सामान्य अध्ययन पेपरमध्ये चालू घडामोडींवर अनेक प्रश्न असतात. रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये केवळ बातम्या असता. पंरतु मासिकांमध्ये याबाबत विस्तृत विश्‍लेषण येते. पंरतु सरसकट कोणतेही मासिके अथवा पेपर वाचून फायदा होत नाही. यासाठी दर्जेदार मासिके वाचायला हवीत. उदा. लोकराज्य, योजना मराठी व इंग्रजी , कुरुक्षेत्र मराठी व इंग्रजी इ.

@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.

चालू घडामोडी केव्हापासून वाचायला हव्या?

रोजच्या रोज चालू घडामोडी वाचून त्यांच्या नोटस काढायला हव्या. आता तुम्ही २०१७ च्या परीक्षेसाठी तयारी करत आहात तर चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी कमीत कमी जानेवारी २०१६ पासूनच्या चालू घडामोडींपासून सुरुवात कारवीच लागेल. तसेच परीक्षेच्या एक महिन्या आधीपर्यंतच्या घडामोडींची तयारी कारायला हवी.

काय वाचायाला हवे?

१. नविन शासकीय योजना

२. शासनाचे धोरणात्मक निर्णय

३. सामाजिक प्रश्‍न

४. आर्थिक मुद्दे

५. आंतरराष्ट्रीय वाटाघाटी / भारताची विदेशनिती

६. विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्दे

७. स्त्री-बालक या संबंधित मुद्दे

८. खेळातील विविध अपडेट

९. कृषी विषयक

१०. कला, साहित्य व इतर

रोजच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मासिके वाचण्यासाठी किती वेळ द्यावा? upsc mpsc chalu ghadamodi

बाजारात मिळणाऱ्या मासिकांमध्ये सर्वच महत्त्वाचे असतात असे नाही. पण एक मासिक जास्तीत जास्त १ ते २ तासात वाचून काढावे आणि त्यावर नोट्स सुद्धा त्याच वेळेत लिहाव्यात. काही मासिकांना मात्र जास्त वेळ द्यावा लागेल कारण त्यात माहिती भरपूर असते तर दररोज १ ते २ तास देवून २ ते ३ दिवसात ते मासिक संपवावे. त्यानंतर दुसरे मासिक हातात घ्यावे आणि ते संपवावे. असे करून ४ ते ५ मासिके पूर्ण करावीत परंतु एकाच वेळी किंवा एकाच दिवशी नाही. जसा वेळ तुम्हाला मिळेल तेव्हा, दररोज एक मासिक पूर्ण करावे.

यानंतर हि तुमच्या काही शंका असतील तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article