---Advertisement---

भारताची सेवा करण्यासाठी सोडली परदेशी नोकरी अन् अभिषेक बनले IAS अधिकारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IAS Success Story परदेशात राहून तेथे काम करणे हे लाखो भारतीयांचे स्वप्न असते. परंतू, असे काही आहेत ज्यांनी आपल्या देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात परतणे पसंत केले आहे. यापैकी एक, IAS अधिकारी अभिषेक सुराणा. त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडली आणि भारताची सेवा करण्यासाठी आय.ए.एस अधिकारी बनले.

पण खरंतर यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे प्रत्येकासाठी सोपे नसते. लाखो तरुण या परीक्षेची तयारी करतात. पण अभिषेक यांनी ही रिस्क घेतली. ते परदेशात चांगली नोकरी आणि व्यवसाय सोडून परतले आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याच्या त्याच्या धाडसाने IAS अधिकारी बनवले, ही कौतुकास्पद बाब आहे.

---Advertisement---

आयएएस अधिकारी अभिषेक सुराणा हे राजस्थान मधील रहिवासी असून त्यांनी राजस्थानच्या भिलवाडा येथून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आयआयटीची परीक्षा दिली. ज्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्यांना आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश मिळाला. येथून शिक्षण पूर्ण करून ते परदेशात गेले. जिथे त्यांनी अनेक वर्षे काम केले आणि नंतर व्यवसाय सुरू केला. पण काही काळानंतर त्याचा त्यातही रस कमी झाला आणि तते भारतात परत आले. जिथे त्याने यूपीएससीची तयारी सुरू केले.

याआधी त्यांनी मोबाईल-आधारित ॲप स्टार्ट-अप कंपनीची स्थापना केली होती. तसेच चिली सारख्या खाजगी कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांना वाटले की त्यांनी यूपीएससी परीक्षेत बसावे आणि आयएएस अधिकारी व्हावे. २०१४ मध्ये अभिषेक सुराणा भारतात परतला आणि युपीएससीची परीक्षेची तयारी जोमाने सुरू केली. अभिषेक सुराणा त्याच्या पहिल्या दोन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. पण त्यांनी आपल्या स्वप्नाचा पाठलाग सुरूच ठेवला आणि शेवटी तिसऱ्या प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. इतकेच नाहीतर २५०वा क्रमांक मिळविला. पण मनासारखे पद मिळाले नाही म्हणून त्यानंतर IAS अधिकारी अभिषेक सुराणा चौथ्यांदा परीक्षेत बसले आणि चौथ्या प्रयत्नात AIR दहावा मिळवला. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जोधपूर येथे कार्यरतआहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts