---Advertisement---

लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न झाले पूर्ण; डोंगरे रेवैया झाले IAS अधिकारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IAS Success Story : डोंगरे रेवैया हे तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद येथील तुंगडा गावचे रहिवासी. ते अवघे चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे आईने संपूर्ण संगोपन केले. उदरनिर्वाह करण्यासाठी रेवैयांच्या आईने केवळ दीड हजार रूपये मासिक पगारावर माध्यान्ह भोजन तयार करण्याचे कार्य हाती घेतले. या कमाईतून त्यांनी आपल्या तीन मुलांचा शैक्षणिक खर्च भागावला.

त्याचे संपूर्ण शालेय शिक्षण हे गावातील गावातील सरकारी शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मग त्यांनी AIEEE परीक्षा दिली आणि चांगल्या रँकसह त्यांना IIT मद्रासमध्ये शिकण्याची संधी चालून आली. पण येथे प्रवेश घेण्याकरिता त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नव्हते. पण हिंमती‌ सोडली नाही त्यांनी IIT मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंगचा इंटीग्रेटेड कोर्स पूर्ण केले. नंतर त्यांनी‌ गेट परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये नोकरी मिळाली.

पण त्यांना लहानपणापासूनच बाळगलेले अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत होते. त्यांनी २०२० मध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी युपीएससीची परीक्षेची तयारी सुरू केली.पहिला प्रयत्न केला, मात्र यात केवळ दोन गुणांनी त्यांची संधी हुकली. त्यांनी पुन्हा पूर्णतः परिक्षेची तयारी करण्यासाठी चक्क नोकरीच सोडली. बालपणापासून ते IAS होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत कित्येक अडचणींचा सामना केला. अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. ते २०२२ मध्ये परीक्षेत ४१० वा क्रमांक पटकावून अखेर आय.ए.एस अधिकारी झाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts