UPSC IAS Success Story उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी असलेले हिमांशू गुप्ता एकेकाळी चहाच्या दुकानात काम करायचे पण त्यांनी सर्व अडचणींना तोंड देत युपीएससी परीक्षा दिली आणि जिल्हाधिकारी ( IAS ) बनले. त्यांच्या जिद्दीची कहाणी नक्की वाचा…
हिमांशू यांच्या वडिलांचा एक छोटा चहाचा स्टॉल होता आणि ते त्याच्या वडिलांच्या दुकानात चहा देत असे. चहाच्या टपरीवर काम करत हिमांशूने यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय यशस्वी झाले.
हिमांश यांनी शालेय शिक्षण अनुक्रमे शिवालिक शाळेत पूर्ण केले. तर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण कुंदन विद्या मंदिर सिव्हिल लाइन्समध्ये पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हिंदू कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी चांगली नोकरी मिळाली. पण त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
आपण फक्त अभ्यास करून जाणार नाही तर घरच्यांना मदत देखील केली पाहिजे या उद्देशाने त्यांनी एका सरकारी कॉलेजमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून काम केले व आपल्या कुटुंबाला हातभार लावला. हिमांशू यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली पण त्याला कमी रँक मिळाला आणि म्हणूनच त्याने युपीएससी परीक्षेत पुन्हा बसण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात ते आयपीएस झाले तर दुसऱ्या प्रयत्नात जिल्हाधिकारी (आयएएस) झाले.सध्या ते युपीमध्ये काम बघत आहेत.