⁠  ⁠

दोन वेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात हितेश मीना यांची IAS पदाला गवसणी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story युपीएससी परीक्षेत दोनदा नापास झालेल्या IAS अधिकाऱ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण, त्याने हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. ते अधिकारी हितेश मीना आहेत. त्यांनी पहिल्या प्रयत्नात स्टेज १ आणि २ – प्रिलिम्स आणि मेन्स यशस्वीपणे पूर्ण केली, परंतू त्यांना अंतिम यादीत स्थान मिळवता आले नाही.परंतू तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले.

शेतकऱ्याचा मुलगा IAS हितेश लहानपणापासूनच हुशार होता. तो त्याच्या शालेय जीवनात मधील टॉपर्सपैकी एक होता. त्याने बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे.ईई परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर IIT BHU, वाराणसी येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

नंतर त्यांनी आयआयटी दिल्लीतून एम.टेक केले. याच काळात त्याने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. यात प्राथमिक व मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा पास केल्या. पण त्याला मुलाखतीच्या फेरीत दोन्ही वेळा अपयशी आले. त्याला अंतिम यादीत स्थान मिळू शकले नाही. मात्र, हार न मानता त्याने परीक्षेसाठी आणखी प्रयत्न केले आणि अखेर त्याची मेहनत फळाला आली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात सर्व फेऱ्या यशस्वीरीत्या पार केल्या आणि २०१८ मध्ये अखिल भारतीय ४१७ वा क्रमांक मिळवला. त्याला अंतिम यादीत ९७७ गुण मिळाले. सध्या ते हरियाणा केडरचे IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Share This Article