---Advertisement---

तमाशा कलावंतीणीचा पोरगा झाला IAS अधिकारी ; वाचा अमित मानेंची प्रेरणा देणारी कहाणी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story आपली परिस्थिती आपल्याला जगण्याचे बळ देते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमित माने. तमासगिरीणीच्या पुत्राची आहे. ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे. अमित यांनी घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज लहानपणापासूनच ऐकला.कोल्हाटी समाजात त्यांचा जन्म झाला. तमाशाच या समाजाचे जग आहे, तमाशालाच हा समाज आपली पंढरी मानतो.

अमितची आई राजश्री काळे या तमाशा कलावंतीण म्हणून आपली कला सादर करत. गावोगावी जाऊन कला सादर करत मिळालेल्या कमाईतून आपला उदरनिर्वाह त्या भागवत असतं.तमाशाच्या वातावरणात अमित काळेंचे शिक्षण पूर्ण झाले. तमाशाच्या सुपारीसाठी अमित यांच्या आईला गावोगावी फिरावं लागायचं.

याच वातावरणात अमितने शिक्षण पूर्ण केले.राजश्री यांनी काळजावर दगड ठेवत पोटच्या मुलाला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं होतं.अमित काळे यांच्या आई राजश्री आजही नगर – पुणे रस्त्यावर कालिका कला केंद्र चालवतात. शिक्षणाची वाट धरण्यासाठी त्याने पुढे हॉस्टेलवर राहण्याचा निर्णय घेतला‌.
अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं राजश्री यांनी उचलला. लहानपणापासून मुलाला चांगले संस्कार दिला. तुला कलेक्टर व्हायचंय, हे ध्येय त्यांनी अमित यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. अमित यांनादेखील परिस्थितीची जाणीव होती.

त्यांनी यूपीएससी परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. अमित चार वेळा यूपीएससी परीक्षेला बसला आणि विशेष म्हणजे चारही वेळा तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. दोनदा त्याला मुख्य परीक्षेत अपयश आले तर आणि दोनदा तो यशस्वी झाला.अशाप्रकारे त्यांचा प्रवास सुमारे चार वर्षे चालला. चूकांमधून शिकला आणि घडला.त्यांची कहाणी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेअशा परिवारात जन्म घेऊन आयएएस अधिकारी बनण्यापर्यंत मजल मारणं यामुळे अमित यांचं यश खास आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts