⁠
Inspirational

बिकट परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश मिळवणारे – IAS तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे नाव ऐकलं की एक अनोखा प्रवास डोळ्यासमोरून जातो.सत्याची कास धरणाऱ्या आणि वैचारिक दृष्टिकोनातून सामाजिक जीवनाकडे पाहणाऱ्या खरा माणूस. सामान्य घरातून जन्माला आलेला माणूस पण काम मात्र असामान्य…साऱ्या जगाला प्रेरणा देणारं ठरतं आहेत.हाच प्रवास जाणून घेऊयात…

शालेय शिक्षण घेतानाही परिस्थितीमुळे कामाची जोड बरंच काही शिकवून गेली…

तुकाराम मुंढे हे बीड जिल्ह्यातील एका खेड्यात राहत होते.त्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं.त्यांना सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती पाहूनच शिक्षण मिळालं. ऐंशी नव्वदच्या काळात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक कमी आणि विद्यार्थी जास्त अशी परिस्थिती होती.त्यात गणित आणि विज्ञान या विषयांना तर शिक्षक मिळणे देखील कठीण होते.त्यांचे तिथेचं दहावी पर्यंतचं जीवनाशी कसरत करून शिक्षण झालं.दहावी पर्यंतच शिक्षण घेतल्यावर त्यांच्या मोठ्या भावाने औरंगाबादला नेलं.तुकाराम मुंढे यांचे वडील शेती करत होते.तसेच ते आठवडाभर शेतात कामं करायचे आणि आठवडी बाजारात नेऊन भाजीपाला विकायचे.त्यामधून मिळालेल्या पैशातून दोन वेळचं जेवण मिळायचे.अशी त्यांच्या घरची परिस्थिती हलाकीची होती.एवढेच नाहीतर आई- वडील कर्जबाजारी होते.शेतात वेळेवर उत्त्पन्न मिळत नव्हतं कारण शेतीची मशागत करायला कुणी नव्हतं,पैसा नव्हता.त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांना शेतीची कामे करावी लागली.जेणेकरून घराला आर्थिक मदत होईल.त्यांचा मोठा भाऊ हा बीडला शिक्षण घेत होता तेव्हा त्यांना महिन्याला दोनशे रुपये पाठवायला देखील यांना कसरत करावी लागत असे.

बिकट परिस्थितीमुळे कष्ट करण्याची सवय लागली.हीच सवय नवा ध्यास बनला….

शेतीमध्ये पाणी देण्यासाठी मोटारपंप बसवले होते पण दिवसभर वीज बंद असायची अशा परिस्थितीत रात्री जाऊन शेतीला पाणी द्यावं लागायचं. मात्र तुकाराम मुंढे सांगतात की याच परिस्थिती मुळे त्यांना कष्ट करण्याची सवय लागली, आयुष्यात काहीतरी करण्यासाठी आपण पावलं उचलली पाहिजेत अस त्यांना वाटू लागलं आणि याच सवयी मुळेच त्यांना पुढे फायदा झाला.

खेड्यातून शहरात आल्यावर अनेक गोष्टींचा समाना

ते शहरात गेल्यावर जेव्हा पहिल्यांदा चित्रपट पाहायला गेले तेव्हाच हा प्रसंग. त्या चित्रपटातील नायकाचा त्यात मृत्यू झाल्याच दाखवलं.नंतर दोन तीन महिन्यांनी जेव्हा ते परत चित्रपट पाहायला गेले तेव्हा तोच नायक जिवंत असल्याचं त्यांना दिसलं, हे कसं काय शक्य आहे, सिनेमा मध्ये मेलेला माणून जिवंत कसा काय होऊ शकतो हे समजण्या इतपत देखील त्यांना माहिती नव्हती, यामुळे खेड्यातून शहरात आल्यावर अशा अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला.शहरात राहायचं कसं?,वागायचं कसं?,जेवायचं कसं? हे देखील तुकाराम मुंडे यांना शिकावं लागलं.

तुकाराम मुंडे यांना मोठ्या भावाकडून मिळाली कलेक्टर होण्याची प्रेरणा!

त्यांच्या मोठ्या भावाची कलेक्टर व्हायची इच्छा होती. परंतु आर्थिक परिस्थिती मुळे करता आले नाही.म्हणून ती इच्छा त्यांनी त्यांचा लहान भावाकडे व्यक्त केली. तेव्हा त्यांना कलेक्टर काय असत?ते कसं व्हायचं असत?हे देखील माहीत नव्हतं.पण त्यांनी ठरवलं की मोठ्या भावासाठी कलेक्टर व्हायचं.

परीक्षेची प्रेरणादायी कहाणी-

तुकाराम मुंढे यांचे मोठे भाऊ शिकवणी घेत असतं.त्यानंतर ते देखील शिकवणी घेऊन लागले.एखादा विषय शिकवताना जो अभ्यास करावा लागायचा त्याचा त्यांना फायदा पुढे झाला. त्यांनी बारावी नंतर कला शाखेत प्रवेश केला.आपण आपल्या ध्येयापासून दूर तर जातं नाही आहोत ना याची काळजी घेतली आणि असं करतच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांनी संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा दिली पहिल्या प्रयत्नात ते पुर्व परीक्षा पास झाले.पण मुख्य परीक्षेला नापास झाले.नंतर त्यांनी नंतर परत पुर्व परीक्षा दिली .यावेळी पुन्हा पुर्व परीक्षा पास झाले आणि मुख्य परीक्षा नापास झाले. पण आधी पेक्षा जवळपास शंभर गुण जास्त आले होते. म्हणून पुन्हा परीक्षा दिली आणि यात ते दोन्ही परीक्षा पास झाले, मुलाखत दिली पण आताही अंतिम निवड झाली नाही. याच दरम्यान त्यांनी Ph.D केली आणि एक शेवटचा प्रयन्त म्हणून पुन्हा संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा देण्याच ठरवलं.

परीक्षेसाठी आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा !

राज्य लोक सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी त्याच दरम्यान जाहिरात आली आणि त्यांनी फॉर्म भरला.यात ते पहिल्याच प्रयत्नात पास झाले पण इतक्यावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा दिली‌या प्रयत्नात ते पास देखील झाले.आधी दोन्ही टप्पे पास झाले असल्यामुळे यावेळी आत्मविश्वासाने ते यामध्ये पास झाले.

अखेर शेतकऱ्यांचा मुलगा कलेक्टर झाला

नंतर एप्रिल मे २००५ च्या मुलाखत दिली आणि जेव्हा निकाल आला तेव्हा ते संपुर्ण भारतात विसावे आले होते तो दिवस होता ११ मे २००५. दुसऱ्याच दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर म्हणून बातमी छापून आली. तेव्हा एवढे दिवस केलेले कष्ट गावापासूनचा शहरापर्यंत आणि तिथून शिक्षणासाठी मुंबई ला केलेल्या प्रवासच खऱ्या अर्थाने सार्थक झालं असं त्यांना वाटलं.

तुकाराम मुंढे यांची विशेष बाब:-

तुकाराम मुंढे म्हणतात की,”हा प्रवास इथेच थांबत नाही तर इथून खरा प्रवास सुरु होतो.ज्या ध्येयासाठी हा प्रवास होता ते ध्येय म्हणजे समाजासाठी काहीतरी करणे. हे साध्य करण्यासाठी मी नेहमीच काम करत राहील”. तसेच ते सांगतात की,”अनेक तरुण-तरुणी या आपल्या ध्येयापासून वंचित आहेत.यामुळे त्यांना त्यांचा उद्दिष्ट साध्य करता येत नाही. म्हणूनच नेहमी आपल्या ध्येयावर केंद्रित राहा,चिकाटीने प्रयत्न करा,हार मानू नका, विचलित होऊ नका. तुम्ही देखील एक दिवस तुमचे ध्येय साध्य करू शकता”.

बदल्यांशी सामना करूनही सत्याची कास…

त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि स्पष्टपणामुळे खूपदा बदल्यांना सामोरे जावे लागले.कित्येकदा वारंवार बदल्या झाल्या.परंतू ते कधीच डगमगले नाहीत.ते नेहमीच कामाशी प्रामाणिक राहिले आणि राहत आहेत‌.

मित्रांनो,
परिस्थिती कोणतीही असली तरी ध्येय आणि जिद्द आणि ध्येय परिस्थिती पुढे झुकतं.हेच तुकाराम मुंढे उत्तम उदाहरण.त्यामुळे यश मिळविताना परिस्थिती आडवी आली तरी त्यावर मात करायला शिका.यश नक्कीच पदरी पडेल.

mpsc telegram channel

Related Articles

Back to top button