इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनमध्ये (IBPS) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२१ आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. किंवा समकक्ष पदवीसह पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
२) फॅकल्टी संशोधन सहयोगी
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. किंवा समकक्ष पदवीसह पदव्युत्तर पदवी
३) संशोधन सहयोगी
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून किमान ५५% गुणांसह मानसशास्त्र / शिक्षण/मानसशास्त्र मापन/सायकोमेट्रिक्स /व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी (एचआर मध्येविशेषज्ञ) ०२) ०१ वर्षे अनुभव
४) हिंदी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव
५) आयटी डेटाबेस प्रशासक
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून पूर्ण वेळ बी.ई. /बी. टेक. पदवी, संगणक विज्ञान/आयटी मध्ये शक्यतो ०२) ०३ वर्षे अनुभव
६) आयटी अभियंता
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून पूर्ण वेळ बी.ई. /बी. टेक./एमसीए/ एम.एस्सी (आयटी)/ एम.एस्सी (संगणक विज्ञान), ०२) ०३ वर्षे अनुभव
७) सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड)/
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून पूर्ण वेळ बी.ई. /बी. टेक./एमसीए/ एम.एस्सी (आयटी)/ एम.एस्सी (संगणक विज्ञान), ०२) ०३ वर्षे अनुभव
वयो मर्यादा :
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, विविध पदांसाठी उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षांदरम्यान असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार यामध्ये शिथिलता दिली जाईल.
परीक्षा फी : १०००/- रुपये.
वेतन –
– सहाय्यक प्राध्यापक – 1,66,541 /- रुपये प्रतिमहिना
– फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स – 98,651 /- रुपये प्रतिमहिना
– रिसर्च असोसिएट्स – 74,203 /- रुपये प्रतिमहिना
– हिंदी अधिकारी – 74,203 /- रुपये प्रतिमहिना
– आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) – 59,478/- रुपये प्रतिमहिना
– आयटी डेटाबेस प्रशासक – 59,478 /- रुपये प्रतिमहिना
– सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड) – 59,478 /- रुपये प्रतिमहिना
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख– १ ऑक्टोबर २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर २०२१
परीक्षेची तारीख – ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२१
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा