IBPS Clerk Recruitment 2022: Institute of Banking Personnel Selection (IBPS) सरकारी बँकांमधील हजारो रिक्त लिपिक पदे भरण्यासाठी १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे 6000 हुन अधिक पदे रिक्त असून याबाबतची अधिसूचना IBPS वेबसाइट ibps.in वर प्रसिद्ध केली. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2022 असेल. IBPS Clerk 2022 Notification
2021 मध्ये, बँकेने भारतातील 11 सरकारी बँकांमध्ये जसे की बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा 7855 रिक्त जागा भरल्या आहेत.
एकूण जागा : ६०००+
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयो मर्यादा : किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे आहे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
SC/ST/PWD रु.175/-
सामान्य आणि इतर रु. 850/-
IBPS लिपिक भरतीची प्राथमिक परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर 2022 मध्ये होणार आहे. IBPS परीक्षा कॅलेंडर 2022 नुसार, लिपिक भरती परीक्षा 28 ऑगस्ट, 3 आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
IBPS लिपिक भरती पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये घेतली जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2022
अधिकृत संकेतस्थळ : ibps.in
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा