UPSC IFS Success Story युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भरपूर तयारी आणि सराव महत्त्वाचा आहे. यात कधी यश मिळते तर कधी अपयश मिळते. IFS अधिकारी कनिष्का सिंग (Kanishka Singh) यांनी २०१८ मध्ये युपीएससीची परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात पास केली. कनिष्का सिंग आता रशियातील मॉस्को येथे कार्यरत आहेत.
कनिष्का सिंग ही मूळची दिल्लीची आहे. तिने लेडी श्री राम कॉलेजमधून मानसशास्त्राची पदवी मिळवली आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने पहिल्यांदा २०१७ मध्ये युपीएससीची परीक्षा दिली. पण ती या परीक्षेत यशस्वी झाली नाही.पहिल्याच प्रयत्नात तिने केलेल्या चुकांमधून ती शिकली आणि दुसऱ्या प्रयत्नात तिला हे यश संपादन झाले. पहिल्या प्रयत्नात तिची परीक्षेची तयारी चांगली नव्हती आणि अनेक मॉक टेस्ट दिल्याने सराव देखील झाला नव्हता. पुन्हा परीक्षेची तयारी केली.
कनिष्क सिंह यांनी तयारी विषयी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की, “युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी उत्तर लेखन खूप महत्त्वाचे आहे. सराव करत राहा आणि एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करा. उमेदवारांनी त्यांच्या क्षमतेनुसार युपीएससीची परीक्षेची तयारी करावी. उत्तरे सुधारणे आणि सतत लिहिणे तसेच वेळेचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे”. त्यांच्या या प्रयत्नांचा आणि प्रवासाचा सल्ला अनेक तरूणांना दिशादर्शक ठरणारा आहे. खरंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी युपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.त्यामुळे या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर शिकण्याचा प्रयत्न असला पाहिजे.