इंडियन बँकेत भरती निघाली आहे. याभरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
रिक्त पदाचे नाव : फायनान्शियल लिटरसी काउंसलर
बँकेत फायनान्शियल लिटरसी काउंसलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६८ वर्ष आहे. या नोकरीसाठी निवृत्त बँक ऑफिसर, आरबीआय, नाबार्ड किंवा सीडबीमधून निवृत्त झालेले असावे. तसेच ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. उमेदवाराला त्याच्या प्रदेशातील भाषा आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
याचसोबत एमएस ऑफिस, टायपिंगचे ज्ञान असायला हवे. उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
इंडियन बँकेतील ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज द झोनल मॅनेजर, इंडियन बँक, RS 66/4A ECR Road,पुदुच्चेरी येथे पाठवायचा आहे.