भारतीय टपाल विभागाचे कार्यालय, वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा यांनी कुशल कारागीर (सामान्य केंद्रीय सेवा, गट सी, अराजपत्रित, अ-मंत्रालयी) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. विविध पदांच्या एकूण 9 जागा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2022 आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) मोटर मेकॅनिक – 5 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे. तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
२) इलेक्ट्रिशियन – 2 पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमधील आयटीआय केले पाहिजे.
३) टायरमन – १ पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमधील आयटीआय केले पाहिजे.
४) लोहार – 1 पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमधील आयटीआय केले पाहिजे.
वेतन :
कुशल कारागिरांसाठी वेतनमान रु.19900 (7व्या CPC नुसार पे मॅट्रिक्समधील स्तर-2)
वयो मर्यादा :
1 जुलै 2022 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे असावे. तथापि, आरक्षणाच्या नियमांनुसार, एसटीसाठी 5 वर्षे, ओबीसी नॉन-क्रिमी लेयरसाठी 3 वर्षे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 35 वर्षांपर्यंतच्या उच्च वयोमर्यादेत सवलत असेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेच्या अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण उमेदवारांना पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर स्वतंत्रपणे दिले जाईल.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 मे 2022
अर्ज कसा करायचा
अर्ज स्पीड पोस्टने किंवा नोंदणीकृत पोस्टाने वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, 134-ए, एसके अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- 400018 वर पाठवावेत. अधिक माहितीसाठी तुम्ही इंडिया पोस्टच्या https://www.indiapost.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- आदित्य श्रीवास्तवच्या जिद्दीला सलाम; UPSC परीक्षेत देशातून पहिला नंबर पटकावला..
- भारतीय खाद्य निगममध्ये नोकरी करण्याची संधी; पात्रता वाचा..
- झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची सेवा करण्याच्या इच्छेने स्पर्धा परीक्षेची तयारी केली ; नितीन झाले आयएएस
- कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांवर भरती
- भारतीय हवाई दलात मोठी पदभरती सुरु; 12वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी