भारतीय टपाल विभागात तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. केंद्र सरकारने देशातील २३ पोस्टल सर्कलमधील (Indian Post recruitment 2022) रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
इंडिया पोस्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार काही पदांच्या जागा खालीलप्रमाणे आहेत.
पोस्टमन 59,099 जागा
मेल गार्ड 1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 37,539 जागा
महाराष्ट्रात किती जागा :
पोस्टमन 9884 जागा
मेल गार्ड 147 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 5478 जागा
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता-
पोस्टल सर्कलमधील पदांसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. याशिवाय काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण अशी पात्रता मागितली आहे.
वयोमर्यादा- भारतीय पोस्टमधील भरतीसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३२ वर्षे असावे.
अशा पद्धतीन करा अप्लाय
इंडिया पोस्ट -indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा
मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा
तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा
स्वतःची नोंदणी करा
फॉर्म भरा
फी भरा आणि सबमिट करा
पुढील वापरासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा आणि प्रिंट आउट घ्या.