---Advertisement---

परीक्षा न देता रेल्वेत ‘या’ पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत गट सी पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट ser.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती (Railway Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 21 पदे भरली जातील. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जाईल.

महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 15 ऑक्टोबर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर

एकूण पदांची संख्या- 21

रिक्त पदाचा तपशील :
गट क स्तर 4/स्तर 5: 5 पदे
गट क स्तर 2/स्तर 3: 16 पदे

शैक्षणिक पात्रता :
स्तर 4 / स्तर 5: उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असावी.
स्तर 2 / स्तर 3: कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 12 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.
परीक्षा शुल्क
यूआर/ओबीसी श्रेणीसाठी परीक्षा शुल्क – रु.500
एससी/एसटी प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – ₹250

निवड प्रक्रिया
या रेल्वेमध्ये रीतसर स्थापन केलेल्या भरती समितीद्वारे प्रमाणपत्र (क्रीडा आणि शैक्षणिक) पडताळणीनंतर स्पोर्ट्स ट्रेल्समधील कामगिरीवर आधारित निवड केली जाईल.

भरतीची जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now