नक्षलवाद्यांविरोधात अनेक यशस्वी मोहिमा करणाऱ्या आयपीएस अंकिता यांची ही यशोगाथा!
IPS Success Story : खरंतर खूप प्रशासकीय अधिकारी हे नक्षलग्रस्त भाग व नक्षलवादविरोधी मोहिमा यांपासून दूर जातात. पण अंकिता यांनी अनेक नक्षलवाद्यांविरोधात यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या धाडसाचे कौतुक सर्वदूर आहे. अंकिता शर्मा या मूळच्या छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातल्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हे गावातल्याच सरकारी शाळेत झाले.
त्यांचे वडील व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे.अंकिता तीन बहिणींमध्ये मोठ्या आहेत.ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एमबीए केले. यानंतर तिने नागरी सेवांसाठी तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला त्या देखील दिल्लीला गेल्या. तिकडे त्यांचं मन रमलं नाही त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांतच त्या दिल्ली सोडून घरी परत आल्या. घरूनच परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
अंकिताला पहिल्या दोन प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळाले नाही, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. साधारण २०१८ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आणि २०३ वा क्रमांक मिळाला. छत्तीसगडच्या त्या पहिल्या महिला आयपीएस आहेत ज्यांना होम कॅडर मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तरमध्ये अनेक नक्षल ऑपरेशनचे नेतृत्व केले.