• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Thursday, February 2, 2023
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Home / 35 वेळा अपयश येऊनही खचला नाही; शेवटी IPS झालाच!

35 वेळा अपयश येऊनही खचला नाही; शेवटी IPS झालाच!

November 24, 2020
Tushar BhambarebyTushar Bhambare
in Inspirational, Success Stories
Vijay Vardhan Success Story
SendShare106Share
Join WhatsApp Group

स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी २-३ अपयश आले कि लगेच दुसरी वाट शोधतात. स्पर्धा परीक्षेची कठीण पातळी अधिक असली तरीही चिकाटीनं अभ्यास करण्याची वृत्ती असल्यास यात हमखास यश येते. स्पर्धा परीक्षेत तब्बल ३५ वेळा अपयश आले तरीही न खचता शेवटी IPS होणाऱ्या आवलियाची सक्सेस स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. हा अवलिया आहे विजय वर्धन…

हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील विजय वर्धन यांनी ३० सरकारी जागांसाठी परीक्षा दिल्या. पण त्यात त्यांना अपयश आले. तरीही यातून खचून न जात विजय यांनी UPSC ची तयारी सुरु केली. परंतु ५ वेळा UPSC मध्येही अपयश आले. तरी विजय वर्धन यांनी हार न मानता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली. अखेर ३६ व्या प्रयत्नांत ते यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले.

विजय वर्धन यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणामध्येच झाले. यानंतर हिसार इथून त्यांनी 2013 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. विजय यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी केली आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दिल्ली गाठली व तेथूनच त्यांनी UPSC परीक्षेचे कोचिंग घेतले.

इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा UPSC परीक्षेत पास होणं हे खूप कठीण मानलं जातं. त्यामुळे सरकारी नोकरीत इतर ठिकाणी परीक्षा देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. यूपीएससी व्यतिरिक्त ए आणि बी दर्जाच्या हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल असे अनेक 30 वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करुन परीक्षा दिल्या होत्या. यापैकी एकही परीक्षेत त्यांची निवड झाली नाही. पण त्यांनी निराश न होता पुन्हा एकदा जोरदार तयारीला सुरुवात केली.

विजय यांचे मुख्य लक्ष्य यूपीएससी परीक्षेवर होते, त्याच अनुषंगाने त्यांनी 2014 पासून यूपीएससी परीक्षा देणे सुरू केले. 2014 आणि 2015 मध्ये विजय फक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मुख्य परीक्षेत नापास झाले. तिसऱ्यांदा विजयने आपल्या तयारीचा मार्ग बदलला. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही विजयचा हेतू डगमगला नाही आणि 2017 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी मुलाखतीत पोहोचले. वारंवार अपयशी ठरले तरी विजय यांचा दृढ निश्चय आणि त्याहीपेक्षा धैर्य वाखाणण्याजोगे होते.

विजय वर्धन यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर विश्वस ठेवून तयारी करणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा :

सलग तीनदा एका गुणाने यश हुकले, पण निराश झालो नाही

१० वी नापास… पण MPSC पास होऊन मिळवले राष्ट्रपती पदक

Join WhatsApp Group
SendShare106Share
Tushar Bhambare

Tushar Bhambare

Tags: Success StoryVijay Vardhan

Comments 3

  1. Rajendra Gavhane says:
    2 years ago

    खूप प्रेरणा दायी आहे.
    स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरांपासून एक प्रेरणा मिळते…

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In