ISRO Bharti 2023 भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये नोकरी मिळविण्याची उत्तम संधी चालून आलीय. ISRO ने काही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार ISRO च्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
एकूण रिक्त जागा : 35
रिक्त पदाचे नाव :
तंत्रज्ञ ‘बी’ – 34
ड्राफ्ट्समन ‘बी’ – 01
वयोमर्यदा १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावी.
अशी होईल निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी असेल. प्रथम ९० मिनिटांच्या कालावधीची लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण असलेले ८० बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.33 गुणांचे नकारात्मक गुण असतील. लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे, उमेदवारांना किमान 10 उमेदवारांसह 1:5 च्या प्रमाणात कौशल्य चाचणीसाठी निवडले जाईल.
परीक्षा फी :
सर्व उमेदवारांना 500 रुपये एकसमान अर्ज शुल्क भरावे लागेल. फी-सवलत श्रेणीतील उमेदवारांना पूर्ण परतावा मिळेल. इतर उमेदवारांसाठी, अर्ज शुल्कातून 100 रुपये वजा केल्यावर 400 रुपये परत केले जातील.
अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in