⁠
Jobs

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोशिएशनतर्फे ”क्लार्क” पदाच्या 40 जागांसाठी भरती

Kolhapur District Urban Banks Cooperative Association Bharti 2023 : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोशिएशन मार्फत क्लार्क पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 27 फेब्रुवारी 2023 आहे. 

एकूण जागा : 40

रिक्त पदाचे नाव : क्लार्क / Clerk
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., एम.बी.ए. या शाखेतील प्रथम श्रेणीतील पदवीधर असणे आवश्यक / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्यास किमान 55% गुण असणे आवश्यक.
02) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक.
03) JAIIB / GDC&A / सहकार विषयक पदवी असल्यास तसेच इतर बँकेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
04) उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील स्थानिक असणे आवश्यक.

वयाची अट : कमाल 25 वर्षे [जन्म 01 जानेवारी 1998 नंतर आवश्यक]
परीक्षा फी : 1000/- रुपये.
पगार (Pay Scale) : 10,000/- रुपये

उमेदवारांसाठी महत्वाचे :
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणेत येईल.
परीक्षा १०० मार्कांची व बहुपर्यायी असणार आहे. पासिंगसाठी किमान ६० मार्क मिळवणे आवश्यक आहे. तथापी गुणवत्ता यादी (कट ऑफ) ठरविणेचे अधिकार बँकेस राहतील. बँकेने ठरविलेल्या गुणवत्ता यादी (कट ऑफ) नुसार उमेदवारांची यादी केली जाईल व सदर यादी प्रमाणे मुलाखतीस बोलवले जाईल.
परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण IBPS च्या धरतीवर आधारित आहे. परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे. परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे ब्रॉशर उमेदवारास त्याच्या ईमेल आयडीवर पाठविले जाईल. सबब ईमेल आयडी पाठविताना अचूक पाठवावा. सदर परीक्षेचे आयोजन कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांचे मार्फत संगणक सुविधा असणाऱ्या योग्य अशा ठिकाणी केले जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.
तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल…
ऑनलाईन परीक्षेच्या निकालाची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.

नोकरी ठिकाण : सांगली, कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन/ई-मेल द्वारे
E-Mail ID : kopbankassorecruit@gmail.com

अधिकृत संकेतस्थळ : www.kopbankasso.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button