---Advertisement---

कोकण रेल्वेमध्ये थेट मुलाखतीद्वारे संधी…जाणून घ्या पात्रता?

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

कोकण रेल्वे (Konkan Railway Recruitment 2021) मार्फत जूनियर टेक्निकल असिस्टेंट या पदांसाठी ही भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे. (Konkan Railway Bharti 2021)

पदाचे नाव : 

१. जूनियर टेक्निकल असिस्टेंट (Junior Technical Assistant) – एकूण जागा 18

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित प्रवाहात BE किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराला ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे.सूट देण्यात आली आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो या कागदपत्रं आवश्यक असणार आहे.

निवड प्रक्रिया :

मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार मुलाखतीच्या तारखेला सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या पदांसाठी नोंदणी करू शकतात.

मुलाखतीचा पत्ता : यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT), पिन-180011

मुलाखतीची तारीख – 13 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.