खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई येथे विविध पदांची भरती
KVIC Mumbai Bharti 2023 खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 12
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सहायक संचालक-I (ग्रामोद्योग):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ सायन्ससह मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव.
सहाय्यक संचालक-I (प्रशासन आणि मानव संसाधन):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव.
सहाय्यक संचालक-I (FBAA): (i) चार्टर्ड अकाउंटंट; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स); किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ कॉमर्स; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव
सहायक संचालक-I (Ec.R):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र/सांख्यिकी/वाणिज्य (विषय म्हणून सांख्यिकी आणि अर्थशास्त्रासह) पदव्युत्तर पदवी; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 35 वर्षे असावे.
परीक्षा फी : 1000
नोकरी ठिकाण: मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.gov.in