---Advertisement---

नोकरीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर.. राज्यात लवकरच मोठी पदभरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

नोकरीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. कारण राज्यात लवकरच मोठी पदभरती निघणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात शासकीय नाेकरीतील एसटी, आेबीसी यांची १५ हजार ४२५ अनुशेषाच्या जागांसह एकूण दाेन लाख ३० हजार ३३० पदे रिक्त आहेत. त्यापैकी ७,३०० पदे सहा महिन्यांत भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ‌उर्वरित सर्व रिक्त पदेही ताबडताेब भरली जातील, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

मागील वर्षापर्यंत शासकीय नोकरीत सुमारे 8 लाख 77 हजार जागांचा अनुशेष होता. 30 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार रिक्तपदांची भरती होईल. या संदर्भात सात हजार 967 पदांसाठी मागणीपत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठविले आहे. दोन वेळा राज्य लोकसेवा आयोगाला स्मरणपत्रे पाठविली आहेत.

---Advertisement---

मंत्री भरणे पुढे म्हणाले की, कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविता आलेली नाही. सध्या 15 हजार 426 पदाचा अनुशेष आहे. मागील सहा महिन्यांत सहा हजार 400 पदासाठी सुमारे 300 जाहिराती दिल्या आहेत. आगामी 15 दिवसांत आणखी पदभरतीच्या जाहिराती देणार आहोत. लवकरात लवकर ही पदे भरण्यात येतील अशी ग्वाही मंत्री भरणे यांनी दिली.

यावर नाना पटोले म्हणाले की, लोकसेवा आयोगाकडून वर्ग एकची पदभरती होते. खरे तर वर्ग दोन व वर्ग तीन कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम करतात. पदोन्नतीतूनही वर्ग एकची पदे भरता येतात. राज्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. विविध विभागातील 2 लाख 3 हजार 302 पदे सर्व विभागात रिक्त आहेत. विधीमंडळातही कर्मचारी कमी आहेत. राज्य शासनाने सकारात्मक विचार करून ताबडतोब भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी, नाना पटोले यांनी केली.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now