Tuesday, April 13, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? धोनीकडून शिका या ५ गोष्टी…

Tushar Bhambare by Tushar Bhambare
March 17, 2021
in Inspirational
1
spardhapariksha-and-ms-dhoni
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT

नुकतीच आपल्या सर्वांच्या आवडत्या महेंद्रसिह धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला नेहमीच “कनेक्टिंग डॉट्स” आढळून येतात. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण जाणून घेऊ…

१) एकाग्रता

स्पर्धा परीक्षांमध्ये एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. धोनीकडून हि एकाग्रता शिकण्यासारखी आहे. एकदा मैदानावर उतरल्यावर क्रिकेट व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच गोष्टींचा तो विचार करत नाही. एम एस धोनी या त्याच्यावरील बायोपीकमध्ये देखील आपण हे पहिले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना तुम्हाला आपल्या व्यक्तिगत जीवनातील गोष्टी बाजूला ठेवता आल्या पाहिजे. अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास…!

२) स्वतःहून जबाबदारी स्वीकारा

२०११चे विश्वचषक तुम्हाला लक्षात असेलच… विश्वचषकाच्या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला लवकर आला होता. धोनीला हे माहिती होते की, त्याच्याकडून छोटीशी जरी चूक झाली तर सामना हातातून जाऊ शकतो व त्याला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे लागते. पण, धोनीने स्वतःवर आत्मविश्वास होता. त्यामुळेच भारताला ते विश्वचषक जिंकण्यात यश आले होते. यामुळे आत्मविश्वासाने नवीन जबादारी स्वीकारा. जीवनात आपण मोठे ध्येय साध्य करायच या उद्देशातून स्पर्धा परीक्षांकडे वळले आहोत तर अथार्त जास्त कष्ट घेणे ही आपली अपरिहार्य जबाबदारीच आहे आणि त्यात आपले १००% देऊ, तेव्हाच यश तुमचे असेल.

३) दबावात अजून चांगले प्रदर्शन

खरं तर जेव्हा खेळाडूंवर जास्त दबाव येतो, तेव्हा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते आणि तो काही तरी चूक करतो. पण, धोनीचे या उलट होते. धोनीवर जितका अधिक दबाव तितका त्याचा खेळ अजून खुलून उठतो. यासाठीच धोनी जगप्रसिद्ध आहे. धोनीकडून आपण हे शिकायलाच हवं. ठराविक वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. यात सुरवातीला थोडी चूक झाली कि आपण पुढे संपूर्ण परीक्षेत चुका करत बसतो. हे प्रकर्षाने टाळणे आवश्यक आहे.

या सोबतच ऐन परीक्षेच्या वेळी कमी दिवसात Final Revision करणे ही बाब सारखीच नाही का ? या वरच पुष्कळदा तुमचं यश अवलंबून असते हे विसरता कामा नये.

४) अपयशाने खचून जाऊ नका

आज धोनीचे सर्वत्र कौतुक होत असेल पण त्याचा सुरवातीचा काळ असा नव्हता. भारतीय संघात आपले स्थान भक्कम करण्यासाठी सुरवातीच्या काळात त्याला फारच मेहनत घ्यावी लागली आहे. तसे पाहिले तर धोनीने अनेकवेळा पराभवाचा सामना केला आहे. पण, त्याने त्याच्या पराभवाचा स्वत:वर आणि संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडू दिला नाही. आपल्या पराभवाचाही त्याने खंबीरतेने स्विकार केला आणि त्यातून नव्या गोष्टी शिकल्या असल्याचे आपण पहिले आहे. याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकांना अपयश येत असते. पण या अपयशाने खचून न जाता अधिक जोमाने पुढील परीक्षेच्या तयारीला आपण लागले पाहिजे.

५) इतरांचा सन्मान करा

धोनी कायमच इतरांशी सन्मानाने वागत आलाय. इतकं प्रचंड यश मिळवल्यावरही धोनीच्या वागण्यात विनम्रता होती. त्याच्या याच स्वभावामुळे सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगसारखे दिग्गज खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळू शकले. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतांना आपल्या सिनियर्स प्रमाणे ज्युनियर विद्यार्थ्यांशी देखील विनम्रतेनेच वागा. एखादे यश आले तर लगेच हवेत न जात जमिनीवर राहा.

या सगळ्यांवर विचार करा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
वरील मुद्दे आवडल्यास हा लेख नक्की शेअर करा.

Tags: MS Dhoni
SendShare1875Share
Next Post

१० वी नापास... पण MPSC पास होऊन मिळवले राष्ट्रपती पदक...

चालू घडामोडी : १६ ऑगस्ट २०२०

मालेगाव महानगरपालिका MMC अंतर्गत विविध पदांच्या 427 जागा

Comments 1

  1. प्र शांत पवार says:
    8 months ago

    खूप छान

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
download-free-lokrajya-PDF
MPSC-PSI-STI-ASO-combine-exam-2020

Recent News

  • BECIL ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या ४६३ जागा
  • CPRF केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांची भरती ; वेतन ७५ ते ८० हजार
  • SECL साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लि.मध्ये विविध पदांच्या ८६ जागांसाठी भरती

Category

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group