महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद मुंबई येथे विविध पदांची भरती
MAHA SBTC Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे आपला अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 12
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रक्त संक्रमण अधिकारी- 04 पदे
शैक्षणिक पात्रता : मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी – एमडी (पॅथॉलॉजी/ रक्तसंक्रमण औषध) किंवा वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) सह पॅथॉलॉजी किंवा रक्तसंक्रमण औषधांमध्ये डिप्लोमा ज्यांना रक्त गट सेरोलॉजीमध्ये पुरेसे ज्ञान आहे, रक्ताच्या खरेदी आणि/किंवा त्याचे घटक तयार करण्यात रक्तगट पद्धती आणि वैद्यकीय तत्त्वे किंवा वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) सह 01 वर्षे अनुभव.
2) रक्तपेढी तंत्रज्ञ – 05 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी) मध्ये पदवी सह रक्त आणि/किंवा त्यातील घटकांच्या चाचणीचा 06 महिन्यांचा अनुभव किंवा 02) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी) मध्ये डिप्लोमा सह रक्त आणि/किंवा त्यातील घटकांच्या चाचणीचा 01 वर्षाचा अनुभव 03) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पदवी किंवा डिप्लोमा.
3) नोंदणीकृत परिचारीका – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : नोंदणीकृत परिचारिका i.e. बी.एस्सी. नर्सिंग पूर्ण केल्यानंतर किंवा एचएससी उत्तीर्ण झाल्यानंतर, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (जीएनएम) मध्ये डिप्लोमा केलेला असावा आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा. किंवा ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफरी (ANM) पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असावी
4) लेखा अधिकारी – 01 पदे
शैक्षणिक पात्रता : कॉमर्स क्षेत्रातील पदवी. उमेदवारास शासकीय / निमशासकीय क्षेत्रातील अनुभव असावा तसेच उमेदवार हा लेखा अधिकारी / लेखापाल किंवा सम कक्ष पदावर सेवानिवृत्त झालेला असावा. शासकीय / निमशासकीय क्षेत्रातील लेखा विभाग तसेच अंकेक्षणाचे तपशिलवार परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारास Tally चे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
वयाची अट : 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्षे सूट, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी – 62 वर्षे]
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
रक्त संक्रमण अधिकारी – 60,000 ते 75,000/-
रक्तपेढी तंत्रज्ञ – 17,000/-
नोंदणीकृत परिचारीका – 20,000/-
लेखा अधिकारी- (निवड आल्यानंतर ठरविण्यात येईल.)
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन /इमेलद्वारे
E-Mail ID : sbtc@mahasbtc.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : SBTC कार्यालय, रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशॉ वाचा रोड, 194, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई- 400020.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahasbtc.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा