Maharashtra Shikshak Bharti 2023 महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाअंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जून 2023 असणार आहे.
एकूण रिक्त पदे : 2384
रिक्त पदाचे नाव : केंद्रप्रमुख
शैक्षणिक पात्रता : फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
पगार : 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना
वयाची अट : 50 वर्षे
परीक्षा फी :
सर्व संवर्गातील उमेदवार: रु.950/–
दिव्यांग उमेदवार: रु.850/-
परीक्षेचे स्वरूप:-
परीक्षेचे टप्पे :– एक – लेखी परीक्षा
परीक्षेचे स्वरूप:- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नपत्रिका :– एक
एकुण गुण:– २०० लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम: – परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा