Tuesday, January 19, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा भूगोल – मृदा

Rajat Bhole by Rajat Bhole
June 11, 2020
in Geography, Study Material
2
Maharashtracha Bugol
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
Advertisements

Maharashtracha Bhugol (Mruda)
Geography of Maharashtra (Soils)

प्रदेश संकल्पना

प्रदेश म्हणजे काय? याचे अगदी साधे सरळ उत्तर ‘एखाद्या विस्तीर्ण क्षेत्राचा लहानसा भाग’ असे सहजपणे देता येईल. एखादे क्षेत्र जेव्हा प्रदेश म्हणून विचारात घेतले जाते तेव्हा त्यात पुढील गोष्टी असणे अपेक्षित असतात.

  • कमीत कमी एका किंवा जास्त गुणधर्माबाबत क्षेत्रात साम्यता/एकरुपता असणे.
  • क्षेत्रीय संलग्नता.
  • क्षेत्रास सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणे
  • साधर्म्य.
  • बहुतांश कापूस क्षेत्र मध्यम पर्जन्याच्या प्रदेशात एकवटलेले आहे.

भूमी संसाधने व भूमी उपयोजन

  • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3,07,580 चौ.किमी आहे.
  • भूमी संसाधनांचा सर्वात जास्त वापर शेतीसाठी केला जातो.
  • शेतीसाठी भूमीची उपलब्धता उंचसखलपणा आणि उतार यांवर ठरते. तर तिची शेतीसाठीची उपयुक्तता प्रदेशातील पर्जन्यावर व मृदांच्या स्थितीवर ठरते.
  • कोकण व पश्‍चिम घाट या भागात उंचसखलपणा जास्त आहे. त्यामुळे तेथील भूमीच्या वापरावर मर्यादा पडतात.
  • राज्यातील पूर्वेकडील प्रेदशात इतर उद्देशांसाठी विशेषत: वनक्षेत्र तसेच खनिज उत्पादनासाठी बरीचशी जमीन वापरली जात असल्याने या भागातही शेतीसाठी जमीन कमी प्रमाणात उपलब्ध होते.
  • मध्य महाराष्ट्रात पर्जन्य कमी प्रमाणात मिळते. अर्थात यामुळे जमिनीची उपलब्धता कमी होत नाही, मात्र तिची शतीसाठी उपयुक्तता बरीचशी कमी होते.
  • तापी, गोदावरी, वर्धा-वैनगंगा, भीमा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या पूर मैदानाच्या भागातील भूमी त्यामानाने शेतीसाठी उपयुक्त आहे.

भूमी उपयोजन

१. लागवडीखालील क्षेत्र

  • महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी 56.6 टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. यालाच लागवडीखालील क्षेत्र म्हणतात.
  • प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, जलसिंचन सुविधा, उताराचे स्वरुप यांचा परिणाम लागवडीखालील क्षेत्रावर होतो.
  • पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70 टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे.
  • कोकण तसेच पूर्व विदर्भामध्ये जमिनीचे तीव्र उतार व वनांचे आच्छादन यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे.
  • वाढत्या लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे शेतजमिनीचा वापर घरांसाठी, वस्त्यांसाठी होत असल्याने शहरी भागाजवळील लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट होत आहे.

२. वनक्षेत्र

  • महाराष्ट्रामध्ये पडणारा सरासरी पर्जन्य सुमारे 1000 मिमी आहे. पर्जन्याच्या वितरणावर वनाचे क्षेत्र अवलंबून असते.
  • सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात वने आढळतात.
  • मध्ये महाराष्ट्र हे अवर्षणप्रवण क्षेत्र असल्याने वनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तेथे सपाट भूमीचा वापर शेतीसाठी केला जातो.
  • प्रत्येक प्रदेशाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भूमीच्या 33 टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात हे प्रमाण खूप कमी आहे. राज्याच्या 17 टक्के क्षेत्रामध्ये वने आहेत.
  • वनांचे क्षेत्र वाढवण्यासाठी सामाजिक वनीकरण योजना राबवून वनांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

३. पडीक क्षेत्र

  • ज्या क्षेत्रामध्ये कधीही पीक घेणे शक्य नसते ते कायम पडीक क्षेत्र होय.
  • मुसळधार पर्जन्यामुळे मृदेचा उत्पादक थर वाहून जातो व जमिनी कायमच्या नापीक होतात. तसेच काही जमिनीवर पाणी साठून तेथे दलदल तयार होते त्यामुळे पीक येऊ शकत नाही. विशेषत: कोकण किनार्‍यावरील खारभूमी प्रदेश कायम पडीक स्वरुपात आहेत.
  • महाराष्ट्राचे मोठे क्षेत्र पर्जन्याव अवलंबून आहे. एखाद्या वर्षी पेरणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही तर जमिनी पडीक ठेवाव्या लागतात. अशा जमिनी चालू पडीक क्षेत्र म्हणून ओळखल्या जातात.
  • जलसिंचन सुविधा पुरवल्यास हे क्षेत्र लागवडीयोग्य बनवता येईल. तसेच त्या जमिनीचा वनशेती किंवा फलोत्पादनासाठी उपयोग करता येईल.
  • कोणत्याही प्रदेशातील भूमी उपयोजन हे शेती व्यवसायावर नियंत्रण करणारे प्राकृतिक घटक आण आजचा समाज यांच्या परस्परक्रियेतून निर्माण होत असते.

४. बिगर शेती क्षेत्र

  • ज्या क्षेत्रामध्ये शेती केली जात नाही त्या क्षेत्राला बिगरशेती क्षेत्र असे म्हणतात. वसाहतीसाठी भूमीचा वापर केला जातो.
  • महाराष्ट्रामध्ये नागरीकरण तसेच औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. अन्य वापरात असलेल्या क्षेत्राचा उपयोग वस्त्यांसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी केला जात आहे.
Maharashtracha Bhugol mruda
मृदांचे प्रकार

मृदांचे प्रकार

१. काळी मृदा

  • बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात.
  • मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.
  • या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण असते. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
  • ही अत्यंत सुपीक मृदा आहे.यामध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते.
  • महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांमध्ये आढळते.
  • महाराष्ट्रात काळ्या मृदांमध्ये कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वाररी, कडधान्ये ही पिके घेतली जातात.

२. जांभी मृदा

  • 2000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य व निश्‍चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते.
  • सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात. परिणामत: लोह व अल्युमिनियम मृदातील प्रमाण वाढते.
  • या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पददार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.
  • महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात ही मृदा आढळते.
  • या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पिके घेतली जाते. डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते.

३. गाळाची मृदा

  • सततच्या संचयनामुळे नदी खोर्‍यांच्या सखल भागात विशेषत: पूर मैदानात ही मृदा आढळते.
  • बारीक पोत व पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहण्यामुळे ही मृदा सुपीक बनते.
  • महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.
  • उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्‍यात खूप खोलवर गाळाचे संचयन झाले आहे. या भागात विस्तीर्ण गाळाच्या मृदांचे क्षेत्र आहे.
  • गाळाची मृदा सुपीक असल्याने या मृदेत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते.

४. तांबडी-पिवळसर मृदा

Advertisements
  • महाराष्ट्रात अतिप्राचीन काळातील गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांवर अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.
  • ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा असून, तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होतो.
  • तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाी असू शकतो.
  • मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अ‍ॅसिड, सेंद्रिय द्रव्य व पोटॅशचे प्रमाण अत्यल्प असते.
  • ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात आहे.
  • या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिके घेता येतात.

मृदेची अवनती

  • मृदांची सुपीकता कमी होणे, त्यांच्या गुणात्मक पातळीचा र्‍हास होणे या स्थितीला मृदेची अवनती असे म्हणतात.
  • मृदेचा अतिवाप, अतिजलसिंचन, रासायनिक खतांचा अतिवापर इत्यादीमुळे मृदेची अवनती होते.
  • चक्रीय पीक पद्धती, जमीन काही काळ पडीक ठेवणे, सेंद्रिय खतांचा वापर इत्यादी उपयांद्वारे मृदेची अवनती कमी करता येते.
  • महाराष्ट्रात जलसिंचन क्षेत्रात मृदा अवनतीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आणि जलसिंचनामुळे मृदेच्या खोल थरातील क्षार मृदेच्या वरच्या थरात जमा होऊन वरचा थर नापीक बनतो. त्यामुळे जलसिंचन प्रदेशातील विस्तारीत क्षेत्र पीक लागवडीसाठी अयोग्य झाले आहे.
Advertisements

Tags: GeographyMaharashtracha Bhugol
SendShare149Share
ADVERTISEMENT
Next Post
चालू घडामोडी : ११ मे २०२०

चालू घडामोडी : ११ मे २०२०

दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा – नागरिकशास्त्राची तयारी

दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा - नागरिकशास्त्राची तयारी

LOCKDOWN DOS DONTS MPSC FAQS

लॉकडाऊन व स्पर्धापरीक्षा यांविषयीचे आपल्याला पडलेले प्रश्न

Comments 2

  1. Pranit Gawali says:
    8 months ago

    good geography notesIMP NOTES

    Reply
    • Rajat Bhole says:
      8 months ago

      Thanks.
      Stay tuned with our site for more updates.

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Mission MPSC offers you complete guidance for the preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Rajyaseva, PSI, STI, Exams.

Follow us on social media:

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group