⁠  ⁠

महावितरण पनवेल येथे ७४ जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : ७४

पदाचे नाव : अप्रेन्टिस Apprentice Electrician

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच दहावीनंतर इलेक्ट्रिकलमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

>>या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही दहावी आणि ITI च्या मार्कांवर केली जाणार आहे म्हणजेच ज्या उमेदवारांना अधिक मार्क्स अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

>>निवड करताना आरक्षणाचा विचार करूनही निवड केली जाणार आहे.

>>उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती अपूर्ण राहिल्यास असे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

ही कागदपत्रं आवश्यक

>>SSC म्हणजेच दहावी आणि ITI शिक्षणाच्या चारही सेमिस्टर्सच्या प्रमाणपत्रांची मूळप्रत.

>>आधारकार्ड

>>मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र.

>>महाराष्ट्राचं Domicile प्रमाणपत्र आवश्यक.

>>उच्च आणि उन्नत गटांमध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र.

>>वरील सर्व प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करताना स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

वेतन : नियमानुसार लागू राहील

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article