⁠  ⁠

MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.पुणे येथे भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MahaTransco Recruitment 2022  : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे. 

एकूण जागा : ३२

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
शैक्षणिक पात्रता :
०१) इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

वयाची अट : २१ ऑक्टोबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक प्रमाणपत्रे/कागदपत्रे (लागू असल्याप्रमाणे) :
एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
शाळा सोडल्याचा दाखला.
आधारकार्ड.
मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र – नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वत: च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोबर २०२२ 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अऊदा संवसु विभाग, बारामती, ”ऊर्जा भवन”, प्रशासकीय इमारत , १ ला मजला, भिगवण रोड, बारामती – ४१३१०२.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article