MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) मध्ये मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून & 04 जुलै 2022 पदांनुसार असणार आहे.
रिक्त पदाचे नाव :
१) थेरपिस्ट
२) तंत्रज्ञ
३) मानसशास्त्रज्ञ
४) विशेष शिक्षण
५) व्यावसायिक सल्लागार
६) स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज
७) सल्लागार
८) समुदाय विकास अधिकारी
९) सहाय्यक प्राध्यापक
१०) वैद्यकीय अधिकारी
११) बहुउद्देशीय कामगार
१२) फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वयो मर्यादा : १ जुलै २०२२ रोजी ६४ वर्षांपेक्षा अधिक असू नये
मानधन :-
या पदांसाठी मानधन Incentive वर अधरित आहे.
दरमहा किमान निश्चित मानधन रुपये 70,000/- (अक्षरी रुपये सत्तर हजार मात्र).
दर दिवशी रुग्णसंख्या 50 च्या वर गेल्यास प्रती रुग्ण रु.40/- याप्रमाणे अधिक मानधन दिले जाईल. जेणेकरुन जर वैद्यकीय अधिका-यांने दररोज 90 रुग्ण तपासल्यास मासिक मानधन अंदाजे रु. 1,10,000 इतके होईल.
एका महिन्यात 2,500 किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण तपासल्यास वैद्यकीय अधिकारी यांना रु. 5,000/- अतिरिक्त प्रोस्ताहन मानधन देण्यात येईल
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 29 जून & 04 जुलै 2022 पदांनुसार
अर्ज करण्यासाठीचा पत्ता :
एफ/दक्षिण कार्यालय 3,मजला बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई ,400012 एच.बी.टी. पॉली क्लिनिक सेल खोली क्र.49. डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008.
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा