MCGM Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : २७
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) 09
शैक्षणीक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) MS-CIT
2) कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) 18
शैक्षणीक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) MS-CIT
वयाची अट: 18 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400001
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
टीप :
भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांची संख्या, आरक्षण / अनुशेष ह्यामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याचे, तसेच प्रवर्गनिहाय पदसंख्या, सामाजिक / समांतर आरक्षण बदलण्याचे अधिकार, तसेच भरतीप्रक्रिया कोणत्याही टप्यावर पूर्वसूचना न देता स्थगित करणे, अंशतः / पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीने महानगरपालिका सचिव ह्यांना राहतील व ह्याबाबत कोणालाही कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही अथवा कोणताही दावा करता येणार नाही.
सामाजिक आरक्षणाची पदे भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे भरतीप्रक्रिया राबविली जाईल.
अन्य समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे भरतीप्रक्रिया राबविली जाईल.
शासनाने विविध शासन निर्णयानुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध सवलती, अटी, शर्ती सदर भरती प्रक्रीयेसाठी लागू राहतील व त्याचे पालन करण्यात येईल.