MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम 15 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : ०१
रिक्त पदाचे नाव : कर्णचिकित्सक आणि वाकउपचार तज्ञ / Audiologist and Speech Therapist
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1 ) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाची ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपि (Audiology & Speech Therapy) ही पदवी धारण करणारा असावा.
2) उमेदवाराने वाक् श्रवण उपचार किंवा कर्णबधिर क्लिनीक मध्ये काम केल्याचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा.
3) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान ५० गुणांची मराठी प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तिर्ण असणे आवश्यक आहे.
4) उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम. एस. सी. आय. टी किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्या करीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा –
सर्वसाधारण उमेदवार – 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई- 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा