Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2022 : मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : २३
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) / Medical Officer (Gynaecologist and Obstetrician) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी. तथापी, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युतर पदविकाधारकामधून (DCH) भरण्यात येईल. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
२) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस) ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
३) औषध निर्माण अधिकारी / Pharmaceutical Manufacturing Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. ०२) सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म पदवी उत्तीर्ण. ०३) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट, १९४८ (८ ऑफ १९४८) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
४) प्रसविका / Midwife १२
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. ०२) शासन मान्यता प्राप्त संस्थेचा ए.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण. ०३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
इतका पगार मिळेल?
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) Rs. 80,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs. 70,000/-
औषध निर्माण अधिकारी Rs. 20,000/-
प्रसविका Rs, 20,000/-
वयोमर्यादा –
मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे 401101
मुलाखतीची तारीख –
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) – 27 डिसेंबर 2022
वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका – 28 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा