⁠  ⁠

महत्त्वाचे : MPSC परीक्षेचे केंद्र बदलता येणार

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे फारच मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवरांना त्यांच्याजवळील जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. पुणे जिल्हा निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागात बाहेरील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या उमेदवारांना त्यांच्या महसूली विभागातील परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. तर पुणे महसूली विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास मुभा असणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान महसुली परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस केले जाणार आहेत.

लॉकडाउनच्या आधी पुणे शहरात आयोगाच्या विविध परीक्षांसाठी मोठ्या संख्येने पुणे विभागाबाहेरील उमेदवार अभ्यासासाठी वास्तव करीत होते. कोरोनामुळे ते आता त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे सध्याचे प्रवासाचे व वास्तव्याचे निर्बंध लक्षात घेता अशा उमेदवारांना आयोगामार्फत रविवार २० सप्टेंबर रोजी आयोजित परीक्षेसाठी परत येणे अशक्य आहे. त्यामुळे पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांचया महसुली मुख्यालयाच्या म्हणजे विभागीय केंद्रात मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

विद्यार्थ्यांना 17 ऑगस्ट दुपारी दोन ते 19 ऑगस्ट सायंकाळी बारा वाजेपर्यंत परीक्षा केंद्र बदलता येणार असून जिल्हा केंद्र निवडण्यासाठी असलेल्या पात्र उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस द्वारे कळविले जाणार आहे. प्रत्येक महसूल विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्रांची कमाल क्षमता लक्षात घेऊन प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान परीक्षा केंद्राची क्षमता संपल्यानंतर केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नसल्याचे आयोगाकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This Article