⁠  ⁠

30 एप्रिलला होणार्‍या MPSC परीक्षेचा डाटा लीक ; आता पेपर कधी होणार?

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

येत्या ३० एप्रिलला होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. याबाबत आयोगाने सायबर पोलिसांत तक्रार केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक (Hall Ticket Hack) करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.

एका टेलिग्राम चॅनलवर 30 एप्रिलला होणार्‍या परीक्षेचा डाटा लीक झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याअनुषंगाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यातील वस्तुस्थिती पडताळणी केली जाईल. पेपर लीक होत नसतात, ते खोटे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी सांगितलं आहे.

30 एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी, पेपर व हॉल तिकीट लीक झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता सायबर पोलिस त्याचा तपास करतील. त्यानंतर सत्यता पडताळून पेपर कधी होणार की ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल हे निश्चित होईल. त्यासाठी 4-5 दिवस वाट पहावी लागेल.

Share This Article